स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांची भेट

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ व स्वामी स्वरूपानंदांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. ॲड. पटवर्धन यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा श्री. कोयटे यांना सादर केला, संस्थेच्या भक्कम आर्थिक स्थितीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना कालखंडातही संस्थेच्या उत्तम वसुलीबाबत ॲड. पटवर्धन आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, संचालक शरदचंद्र लेले व उपव्यवस्थापक हेमंत रेडीज उपस्थित होते.